भुसावळातील छायाचित्रकारांतर्फे जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून भुसावळातील वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वतीने कॅमेरा पूजन करून हा विशेष दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज संकुलात बुधवार, 19 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा, कमलेश चौधरी आणि विनोद गोरधे यांच्याहस्ते कॅमेर्‍याचे विधीवत पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी पत्रकार प्रेम परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छायाचित्रकारांच्या सामाजिक जबाबदारीवर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला पत्रकार उज्वला बागुल, संतोष शेलोडे, सुनील आराक, प्रेम परदेशी, किशोर सावळे यांच्यासह छायाचित्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील आराक यांनी तर उपस्थितांचे आभार संतोष शेलोडे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !