रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटच्या वर्ष 2026-27 च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा ‘नवपर्व’ हा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून रोटारॅक्टर मिथिलेश खैरनार तर सचिव म्हणून रोटारॅक्टर जान्हवी सोनवणे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि पदाधिकार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 2010 सालापासून या क्लबची सुरुवात झाली असून गेल्या 16 ते 17 वर्षांपासून हा क्लब अविरतपणे कार्यरत आहे. आज हा क्लब जिल्हयातील सर्वोत्तम क्लब म्हणून ओळखला जातो.आपल्या प्रास्ताविकात संचालक रो. डॉ. प्रशांत वारके यांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या तुम्ही जगासाठी काय करता, हेच जगातील सर्वात महत्त्वाचे काम आहे या प्रसिद्ध विचारांचा दाखला देत त्यांनी तरुण रोटारॅक्टर्सना समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरित केले. रोटारॅक्ट क्लबच्या आजवरच्या सामाजिक कार्याचा गौरव करत नवीन टीमला भविष्यातील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॉलरिंग आणि पदग्रहण विधी संपन्न करून नवनिर्वाचित अध्यक्ष मिथिलेश खैरनार आणि सचिव जान्हवी सोनवणे यांना अधिकृतपणे पदभार सोपवण्यात आला.
या सोहळ्याला क्लबचे चेअरमन रो.अजित महाजन, एडीआरआर रो. वैभव आबोटी, रोटरी व रोटारॅक्ट क्लबचे अध्यक्ष, सचिव, प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने रोटारॅक्ट सदस्य उपस्थित होते. रो.राजीव बियाणी यांनी नवनिर्वाचित टीमला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, रोटारॅक्ट हे युवकांसाठी स्वतःतील नेतृत्वगुण आणि कौशल्ये सादर करण्याचे एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून मिळणारा अनुभव भावी आयुष्यात नक्कीच दिशादर्शक ठरेल.नवीन संकल्प अन् सामाजिक बांधिलकी, नवनिर्वाचित अध्यक्ष मिथिलेश खैरनार यांनी आपल्या मनोगतातून, येत्या वर्षात युवक सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर देऊन ‘नवपर्व’ अंतर्गत क्लबला एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.
सूत्रसंचालन रोट्रॅक्टर तेजस्विनी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या सोहळ्यामुळे सर्व नवोदित रोटारॅक्ट सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


