नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तळोद्यातील दोन घरफोड्यांची उकल

अल्पवयीन चौकडीचा कारनामा : 91 हजार 462 रुपयांचा मुद्देमाल जप्त


नंदुरबार (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा शहरातील दोन घरफोड्यांची यशस्वी उकल केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे दोन घरफोड्यांची उकल केल्यानंतर या कारनाम्यात शहरातील अल्पवयीन चोरट्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले तर चौकडीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी 91 हजार 462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.

नंदुरबार गुन्हे शाखेची कारवाई
नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने तळोदा परिसरात तपासाची मोहीम राबविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना 20 ऑगस्ट रोजी निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली.

तळोद्यातील हरकलाल नगरात झालेली घरफोडी तसेच पंधरवड्यापूर्वी नगरपालिका संकुल परिसरातील एका किराणा दुकानातील चोरी शहरातीलच तीन अल्पवयींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या चोरी अन्य एका साथीदारासोबत केल्याची कबुल करीत 91 हजार 462 रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला.

यांनी उघडकीस आणल्या घरफोड्या
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, निशीगंध गवळे, राहुल पांढारकर, विशाल मराठे, सचिन सैंदाणे आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !