टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

रोबो सॉकरमध्ये प्रथम क्रमांक; रोबो वॉरमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल


जळगाव (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगावच्या ‘टीम व्ह्यूअस्त्र रोबोटिक्स’ संघाने चेन्नई (तमिळनाडू) येथील एसआरएम युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संघाने रोबो सॉकरमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण यश मिळवले, तर रोबो वॉर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह परदेशातील 200 हून अधिक स्पर्धक व संघांनी सहभाग घेतला होता. रोबो सॉकर प्रकारात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य संघांना सामोरे जात टीम व्ह्यूअस्त्रने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि नियोजनाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. संघाच्या या कामगिरीमुळे गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या शैक्षणिक आणि तांत्रिक गुणवत्तेचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. दरम्यान, रोबो वॉर या अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानात्मक प्रकारातही संघाने दमदार कामगिरी केली.

प्रतिस्पर्धी संघांच्या कडव्या आव्हानांना सामोरे जात टीम व्ह्यूअस्त्रने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. एका स्पर्धेत दोन उल्लेखनीय कामगिरी, अशी ऐतिहासिक नोंद टीम व्ह्यूअस्त्रने केली असून या यशाबद्दल गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि व्यवस्थापनाकडून संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !