घुसर्डी खुर्दचे शेतकरी रायचंद बापू परदेशी कृषी पुरस्काराने सन्मानित
भडगाव (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : कृषी क्षेत्रात सातत्यपूर्ण नाविण्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल घुसर्डी खुर्द तालुका भडगाव, जि.जळगाव येथील आदर्श शेतकरी तथा शेतकरी सहकारी संघ भडगावचे संचालक रायचंद शामसिंग परदेशी यांना नाशिक येथे अॅग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीतर्फे स्व.वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार महाराष्ट्र इन्स्पायर अॅवार्ड्स 2026 ने सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
नाशिकमधील पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रायचंद बापु परदेशी यांनी अॅग्रो केअर ग्रुपचे आभार व्यक्त करत हा सन्मान शेतकरी बांधवांचा अथक परिश्रमांना संपन्न समर्पित असल्याने सांगितले.



पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
पुरस्कारानंतर परदेशी, राजपूत, मीना समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, तंटामुक्त समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, उपाध्यक्ष भगवान डेडवाल, समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष अशोक बापू परदेशी, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदल गोठवाल, जामनेर तालुकाध्यक्ष अमोल कायठे, सोयगाव तालुकाध्यक्ष दिलीप मचिये, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान महेर, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश चांंदा, सर्व जिल्हा कार्यकारीणी सदस्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
