जावळे येथे परदेशी-राजपुत समाज उन्नती मंडळाची 6 सप्टेंबरला आमसभा : गुणवंतांचा होणार सन्मान
चाळीसगाव (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : चाळीसगावातील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाची आमसभा जावळे, ता.चाळीसगाव येथे रविवार, 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता होत आहे. ही आमसभा उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या सभेत जावळे येथील मंगल कार्यालयाच्या बांधकाम प्रगती व बांधकाम पुर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजनाबाबत चर्चा यासह अजेंड्यानुसार विविध विषयांवर चर्चा विनीमय करण्यात येईल.
गुणवंतांचा होणार सन्मान
यावेळी समाजातील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. समाजातील दहावी, बारावी परीक्षेत 80 टक्क्ंयांपेक्षा जास्त गुण मिळाले असतील व त्याचप्रमाणे शासनाच्या विविध परीक्षेत यश मिळवणार्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येईल. संबंधितांनी आपली माहिती डॉ.के.एस.परदेशी, लक्ष्मीनगर, चाळीसगाव (फोन नं. 02589 – 222622) या पत्त्यावर 5 सप्एंबर 2026 च्या आत पाठवावी.



समाजबांधवांनी उपस्थितीचे आवाहन
सभासद, मान्यवर, समाजबांधवांनी या आमसभेस उपस्थिती द्यावी, असे आवाहन परदेशी-राजपुत समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, उपाध्यक्ष मथुराबाई भगवानसिंग लोदवाळ, खजिनदार डॉ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, अॅड.हिरालाल पुनमचंद परदेशी, भगवान रघुवीररसिंग परदेशी, अशोक महादू परदेशी, संचालिका डॉ.सुशिला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश जयसिंग परदेशी यांच्यासह संचालक मंडळामार्फत करण्यात आले.
जावळे येथे समाजाच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू असून समाजबांधवांनी आर्थिक मदतीचा हात द्यावा व समाजकार्यास हातभार लावावा, असे आवाहन परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत करण्यात आले आहे.

