जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर
जळगाव (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेने जबलपूर ते कोयंबतूर दरम्यान धावणार्या विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रूपांतर केले आहे. या गाड्या आता नवीन गाडी क्रमांकांसह नियमित मेल/एक्सप्रेस गाड्या म्हणून धावणार असल्याने प्रवाशांची सुविधा वाढण्यासोबतच रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
असे आहे गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 20160 जबलपूर-कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस 23 ऑक्टोबरपासून 2026 पासून दर शुक्रवारी जबलपूर येथून सुटेल तर
गाडी क्रमांक 20159 कोयंबतूर-जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस 26 ऑक्टोबर 2026 पासून दर सोमवारी कोयंबतूर येथून सुटेल.

गाडी क्रमांक 20160 जबलपूर-कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस 23 ऑक्टोबर 2026 पासून दर शुक्रवारी जबलपूर येथून 11.50 वाजता सुटेल आणि रविवारी कोयंबतूर येथे 2.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 20159 कोयंबतूर-जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 26 ऑक्टोबर 2026 पासून दर सोमवारी कोयंबतूर येथून 5.05 वाजता सुटेल आणि बुधवारी जबलपूर येथे 8.45 वाजता पोहोचेल.
असे आहेत थांबे
या गाडीला जबलपूर, नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड मेन, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
