भडगाव शहरातील ‘प्रहार दिव्यांग’ संघटनेचे उपोषण सुटले


भडगाव (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : दिव्यांंग लाभार्थींचे सहा महिन्यांपासून थकीत मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी भडगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेमार्फत 1 रोजी सकाळी 11 वाजेपासुन भडगाव तहसीलसमोर उपोषण छेडण्यात आले. उपोषणस्थळी संगायो योजना तहसीलदार रमेश देवकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्याने 1 सप्टेंबरला दुपारी हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी सोबत संगायो योजनेचे अधिकारी एस.डी.सोनवणे हे ही उपस्थित होते. उपोषणस्थळी नागरीकांनी भेटी देऊन उपोषणास पाठींबा दिला होता.

यांचा उपोषणात सहभाग
यावेळी उपोषणात संघटनेचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंहले, जिल्हा सचिव धर्मराज पाटील, ज्येष्ठ सल्लागार राजु परदेशी, तालुकाध्यक्ष कर्तारसिंग रामसिंग परदेशी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रत्नाबाई निकम, तालुका सल्लागार भरत धोबी, तालुका उपाध्यक्ष भारत पाटील, शहराध्यक्ष संजय कोळी, कार्याध्यक्ष गजानन तांबटकर, तालुका संपर्कप्रमुख निलेश पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष रवी पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष अविनाश मराठे
आनंदा पाटील, राजेंद्र पाटील. चंदू महाजन, भावडू सावंत, भगवान पाटील यांच्यासह दिव्यांग बांधव, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !