भुईमुंगाच्या पिकाआड फुलवली गांजाशेती : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 19 लाख 18 हजारांचा गांजा जप्त
शहादा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई : जामजिर्यातील संशयीताविरोधात गुन्हा
शहादा (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने शहादा पोलीस ठाणे हद्दीतील मलगाव-सटीपाणी शिवारात भुईमुंगाच्या शेतीआड फुलवलेल्या गांजाी शेतीवर कारवाई केल्यानेविक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तब्बल 39 किलो चार ग्रॅम वजनाची व 18 लाख 19 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी संशयीत ठाणसिंग हुंड्या उर्फ दुंड्या पावरा (जामजिरा जाळोद, पोस्ट तर्हाड कसबे, ता.शिरपूर, जि. धुळे याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलमांदेवी शिवारात एका भुईमूग पिकाच्या शेतात शेतमालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणार्या गांजाच्या रोपांची लागवड केल्याची माहिती मिळताच त्यांनी खातरजमा करीत छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 39 किलो 4 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाची अंदाजे बाजारातील किंमत 18 लाख 19 हजार रुपये आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, स्वप्नील गोसावी, मोहन ढमदेरे, पोलीस अंमलदार भरत उगले, शोएब शेख, विशाल मराठे, सतीश घुले, रवींद्र अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

