जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 7 सप्टेंबरला आयोजन
जळगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात होत आहे.
नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केलेला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.


