बोदवड शहरात जनरल स्टोअर्स फोडले : 60 हजारांच्या रोकडसह एक लाखांचे साहित्य लंपास
बोदवड (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : शहरातील रेणुका माता मंदिराजवळील सहेली जनरल स्टोअर्स फोडून 60 हजारांच्या रोकडसह 40 हजार रुपये किंमतीचे स्टेशनरीचे साहित्य लांबवण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्रे उचकवून केली चोरी
राजेंद्र रामकिसन अग्रवाल (60, बोदवड) यांचे शहरातील रेणुका माता मंदिराजवळ सहेली जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. 3 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चोरट्याने दुकानावरील पत्रा उचकवून दुकानात प्रवेश केला व ड्रावरमधील सुमारे 60 हजारांची रोकड तसेच 40 हजार रुपये किंमतीचे स्टेशनरीचे साहित्य लांबवले. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


