भुसावळ वाहतूक शाखेत पोलिसांसाठी फिटनेस मूल्यांकन शिबिर

40 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्ती तपासणी


भुसावळ (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी फिटनेस मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात पोलिसांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, हृदय व श्वसन फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ.अमित जैस्वाल, सहाय्यक प्राध्यापक डॉ.प्रियांका घुमनानी, निवासी डॉक्टर डॉ. सुदेश वायदंडे आणि डॉ.पूजा गुरुदासानी तसेच त्यांच्या टीमने शिबिरासाठी सहकार्य केले.


शिबिरात सुमारे 35 ते 40 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वायएमसीए 3 मिनिट स्टेप टेस्ट घेण्यात आला. या चाचणीच्या निकालांच्या आधारे सहभागींच्या फिटनेस पातळीचे वर्गीकरण करण्यात आले.

प्रत्येकाच्या फिटनेस लेव्हलनुसार योग्य व्यायाम, नियमित शारीरिक सक्रियता आणि तंदुरुस्ती टिकविण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !