नशिराबादमधील कुख्यात शोएब बिल्डर येरवडा कारागृहात स्थानबद्ध


जळगाव (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : नशिराबाद शहरातील शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (35, रा.ख्वाजा नगर, नशिराबाद) यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर येरवडा, पुणे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सात गंभीर गुन्ह्यांची नोंद
पोलिसांच्या माहितीनुसार, 2021 ते 2026 या कालावधीत शोएब बिल्डरविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात सात गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, रस्ता अडवणे, गर्दी जमवणे, साधी दुखापत करणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपीच्या वर्तुणात सुधारणा होत नसल्याने नशिराबादच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे यांनी 30 जून 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आरोपीविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला.


या प्रस्तावावर छाननी झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर संशयीताला स्थानबद्ध करण्याचे आदेश 4 सप्टेंबरला पारीत करण्यात आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !