रावेर तालुक्यातील 22 वर्षीय विवाहितेवर अत्याचार
रावेर (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : रावेर तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संशयीताविरोधात रावेर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
रावेर तालुक्यातील एका गावात शुक्रवारी 22 वर्षीय विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी अरुण भागवत यवतकर याने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करीत दरवाजा लावून घेतला व पीडीतेवर अत्याचार केला. पीडीतेने या प्रकरणी पोलिसात धाव घेत यवतकरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत.


