जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘सनराईज आणि सरेंडर’
रनिंगसोबत निसर्गभ्रमंती, ध्यान, संगीत, डान्स अन् खाद्यसंस्कृतीचा अनुभव ; 27 सप्टेंबरला जैन हिल्सवर अनोखी मॉनिंग जर्नी
जळगाव (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत निसर्गाच्या सान्निध्यात शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा “सनराईज आणि सरेंडर द मॉर्निंग जर्नी’ हा अनोखा उपक्रम 27 सप्टेंबर 2026 रोजी जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘द अनप्लग प्रोजेक्ट’ च्या माध्यमातून होणार्या या उपक्रमाची सुरुवात सकाळी वाजता होणार आहे. हा केवळ रनिंग इव्हेंट नसून धावणे, निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डीजे, डान्स, कॉफी आणि उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी असणार आहे.
निसर्गरम्य परिसरात सिनिक रन, नेचर वॉक सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेता येणार आहे. ‘नॉट जस्ट फन’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा आहे. ‘मुव्ह, बे्रथ, बिलाँग, डान्स’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.
अहमदाबादचे पारस दलाल सादरीकरण करणार
या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळणार आहे. 27 सप्टेंबरची सकाळ जळगावकरांसाठी ‘र्ठीप पासून ठशश्ररुरींळेप पर्यंत’ आणि ‘र्चीीळल पासून चशवळींरींळेप पर्यंत’ चा नवा अनुभव घेऊन येणार आहे.
17 सप्टेंबरपर्यंत अर्ली बर्ड नोंदणी
उपक्रमासाठी अर्ली बर्ड तिकीट 2,400 रुपये, रेग्युलर तिकीट 2,600 रुपये आहे. पाच जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती 2,450 रुपये, तर दहा जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती 2,380 रुपये शुल्क आहे. अर्ली बर्ड नोंदणीची अंतिम तारीख 17 सप्टेंबर आहे. अधिक माहिती व बुकिंगसाठी अंबिका – 9829155572, जयंतिका – 9850087002 आणि सनम – 9552922333 यांच्याशी संपर्क साधता येईल.

