गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
जळगाव (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे गणपती बाप्पांचे आगमन अत्यंत उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
गणेशमूर्तीची स्थापना श्री. व सौ.मिलिंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आली. पंडित श्री. शैलेश नाईक यांच्या विधिवत पूजाविधीने गणेश स्थापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व आकर्षक स्वागत नृत्याने कार्यक्रमात उत्साह आणि चैतन्य निर्माण केले.



या सोहळ्यास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉ. उल्हास पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे संचालक डॉ. एन. एस. अर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार श्री. प्रमोद भिरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्नेहल जांभुळकर, मंजिरी मडावी, प्राजक्ता सावकार, श्री. सूरज खवाटे, श्री. सुमित भारंबे व श्री. प्रेशित गायकवाड यांनी 7व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेश आगमन व स्थापना सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमामुळे महाविद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करण्यात आली.
