जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 21 रोजी
जळगाव, दि.18 (जिमाका) : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, तसेच महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेमार्फत सोडवणूक करण्यासाठी आणि पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
त्यानुषंगाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.



संबंधित महिलांनी आपल्या तक्रारी व अडचणी मांडण्यासाठी महिला लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
