मनसे माजी शहर उपाध्यक्षांची हत्या : दोघा आरोपींना कोठडी
जळगाव : पैशांच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर उपाध्यक्ष घनश्याम शांताराम दीक्षित (35, रा.ईश्वर कॉलनी) यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याची रविवारी पहाटे साडेसहा वाजता घडली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) व मोनीराज उर्फ मोन्या अशोक कोळी यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोघांना 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. श्याम दीक्षित याला मुन्ना व सनी यांनी ईश्वर कॉलनीजवळ गाठले नंतर काही अंतरावर असलेल्या मंदिरावर नेवून त्याठिकाणी रागातून त्याच्या डोक्यात टाकून त्याची हत्या केली होती. एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.