चोपड्यातील चित्रकार अनिलराज पाटील यांच्या ‘पेन इंक छायाचित्राला’ नैनितालमध्ये प्रथम पारितोषिक


चोपडा (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : चोपड्यातील चित्रकार अनिलराज पाटील यांनी उत्तराखंडच्या नैनीताल येथील मिट्टी से रंग तक सांस्कृतिक संस्थेमार्फत गणेशोत्सव 2026 निमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर चार गटातील चित्र प्रदर्शन स्पर्धेत भाग घेतला. राज्यातून एकमेव चित्रकार अनिलराज यांचे ‘सुपकर्ण हे गणपती बाप्पा’ चे सुंदर असे पेन इंकच्या सहाय्याने रेखाटलेल्या स्टिपलिंग शैलीतील चित्राला ग्रँड पारितोषिक प्राप्त झाले. चित्रप्रदर्शन व स्पर्धेत अनेक चित्रांची निवड झाली असून येत्या 26 सप्टेंबरपासून प्रदर्शनाला सुरूवात झाली आहे.

‘मिट्टी से रंग तक संस्थेचे फाउंडर व अध्यक्षा चित्रकार डॉ.पूनम यांनी समितीने अनिलराज यांच्या चित्राला प्रथम पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक केले. चित्रकार अनिलराज यांनी या आधीही चित्रकला पुरस्कार प्राप्त केले असून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !