गुन्हेगार दत्तक योजनेची अंमलबजावणी न करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करणार


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा इशारा : रात्री सरप्राईज व्हिजिट देवून पोलिसांची गस्त तपासणार

जळगाव : आरएफआयडी योजना कार्यान्वित केल्यानंतरही कर्मचार्‍यांकडून संबंधित पॉईंटवर हजेरी लावणे क्रमप्राप्त असताना कर्मचारी मात्र नावालाच गस्त घालत असल्याने यापुढे रात्रीच्या वेळी जिल्ह्यात सरप्राईज व्हिजिट करणार असून गस्त न घालणारे कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हेगार दत्तक योजनेचीही पुन्हा अंमलबजावणी करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले. ते म्हणाले की, एका शीटमध्ये महिन्यानुसार प्रत्येक कर्मचार्‍यांना वेगवेगळी ड्युटी लावण्यात येणार आहे. त्याची सरप्राईज भेट देवून अधिकारी खात्री करणार असून पालन न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यानिहाय गुन्हेगार तसेच गँगची यादी तयार करण्यात आली आहे. गुन्हे दत्तक योजनेनुसार एक पोलीस ठाण्याचा व एक एलसीबीचा कर्मचारी अशा दोघांना एक गुन्हेगार दत्तक देण्यात येणार आहे. तसेच महिन्यातील प्रत्येक शनिवारी आरोपींची ओळखपरेड करण्यात येणार असल्याचेही डॉ.पंजाबराव उगले म्हणाले.


कॉपी करू नका.