दुसखेड्यातील तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू


पाचोरा (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : धावत्या रेल्वेतून पाय घसरून खाली पडल्याने दुसखेडा (ता.पाचोरा) येथील 36 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवार, 5 सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. संजय अनिल पाटील (36, रा. दुसखेडा) असे मृताचे नाव आहे.

रेल्वेतून पडल्याने मृत्यू
संजय पाटील हे अहमदाबाद येथे एका खाजगी कंपनीत वेल्डिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते अहमदाबादहून गावाकडे येण्यासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे जळगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाचोरा येथे येण्यासाठी रेल्वेने प्रवास सुरू केला. परधाडे ते पाचोरा दरम्यान रेल्वे पोल क्रमांक 381/26 जवळ अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पाचोरा पोलिसात नोंद
घटनेची माहिती मिळताच पाचोरा ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाटील यांनी ‘जय महाकाल’ रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह चालक किशोर लोहार व मयूर सोनार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मृत संजय यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक हरीश गवळी तपास करत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !