भुसावळातील हिंदी महाविद्यालयात नवीन मतदात नोंदणी अभियान


भुसावळ (शनिवार, 7 ऑक्टोबर 2026) : शहरातील हिंदी महाविद्यालयात 1 ते 8 ऑक्टोबर 2026 रोजी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या आवाहनानुसार ज्यांचे 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन मतदाता ओळखपत्र अभियान आयोजित करण्यात आले. अ‍ॅम्बेसेडर आकाश पवार व आदिती शर्मा यांनी विद्यार्थ्यांकडून मतदाता फॉर्म भरून घेतले.

मतदान नोंदणी मोहिमेत सहभागाचे आवाहन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांनी नवीन मतदाता नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
या अभियान अंतर्गत शंभर विद्यार्थ्यांनी नवीन मतदाता नोंदणी अभियानात भाग घेऊन फॉर्म भरले. प्रा.अनुपम शर्मा यांनी नवीन मतदाता पंजीयन फॉर्म कसे भरावे यासाठी सर्व आवश्यक सूचना दिल्या. अभियान सफल करण्यासाठी प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल आणि सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !