धरणगावात गुडस हाऊसमधून अडीच लाखांचे डिस्क ब्रेक लांबवले : दोघांविरोधात गुन्हा
धरणगाव (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील अॅस्टेमो कंपनीच्या फिनिशड गुडस् वेअर हाऊसमधून दोन लाख 53 हजार रुपये किंमतीचे डिस्क ब्रेक लांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी दोघांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल एकनाथ सोनवणे (37, शिंपी गल्ली पिंप्राळा, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयीत भूषण अशोक बडगुजर (25, कढोली) व केशव सीताराम मते (36, चिंचोली, ता.फुलंब्री) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीत आरोपींनी अॅस्टेमो कंपनीच्या फिनिशड गुडस् वेअर हाऊसमधून दोन लाख 53 हजार रुपये किंमतीचे 40 फोर व्हिलरचे डिस्क ब्रेक लांबवले. तपास पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप खंडारे करीत आहेत.



