लग्नासाठी अडीच लाख देवून आणलेल्या छत्तीसगडच्या तरुणीने पारोळ्यातील कुटूंबाला दिले विष ; पसार होण्याच्या प्रयत्नात लुटेरी दुल्हनसह दोघांना बेड्या

टोळीचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा : पारोळा पोलिसात चौकडीविरोधात गुन्हा


पारोळा (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : उपवर मुलांच्या लग्नाची चिंता सतावणार्‍यांसाठी ही बोध घेणारी बातमी आहे. खान्देशात मुली मिळत नसल्याने थेट छत्तीसगडमून अडीच लाख रुपये देवून तरुणीला आणून तिचा विवाह लावण्यात आला पारोळा तालुक्यातील वेल्हाणेच्या तरुणाशी विवाह लावण्यात आला. विवाहाच्या दोन दिवसांनी टोळीतील साथीदारांच्या मदतीने नवविवाहित लुटेरी दुल्हनने सासरच्या मंडळींच्या जेवणातील खिरमध्ये विष कालवत घरातील रोकड लुटून पळ काढला. काही वेळानंतर कुटूंब भानावर आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलाला माहिती दिल्यानंतर पारोळा पोलिसांना माहिती कळवण्यात आली व धुळे जिल्ह्यातील निमगुळजवळून दोन्ही आरोपींड्या बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींच्या अटकेने फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

जाणून घ्या फसवणुकीचा घटनाक्रम
पारोळा तालुक्यातील वेल्हाणे गावातील 32 वर्षीय वाल्मिक ताराचंद पाटील या तरुणाच्या विवाहासाठी लग्न जुळवणारा एजंट विनोद निंबा पाटील (पिंप्राळा, ता.जळगाव) यांच्या माध्यमातून अडीच लाख रुपये देवून छत्तीसगडमधील सुमन सुभाष सहाणीसोबत लग्न निश्चित झाले. 7 ऑक्टोबर 2026 रोजी वेल्हाणे लग्नसमारंभ पार पडल्यानंतर तरुणीसोबत आलेल्या आरती सूर्यप्रकाश पटेलने 9 रोजी रात्री सात वाजेता नवविवाहित विनोद पाटील, त्याचे वडील ताराचंद शांताराम पाटील, आई सरलाबाई ताराचंद पाटील व भाऊ वाल्मीक ताराचंद पाटील (सर्व रा.वेल्हाणे) यांच्यासाठी खिर बनवत त्यात उंदीर मारण्याचे औषध टाकले. रात्री कुटूंब झोपल्यानंतर आरोपी सुमनने सोबत आणलेल्या साथीदार आरती पटेलसोबत घरातील रोकड लुटत शनिवार, 10 रोजी पळ काढला.

कुटूंब भानावर येताच यंत्रणेने सुरू केला शोध
कुटूंबावर झालेल्या विष प्रयोगानंतर शनिवारी त्यांना त्रास होवू लागताच त्यांनी गावातील पोलीस पाटलाला घडला प्रकार कळवला व तातडीने पारोळा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत धाव घेत पाहणी केली व खरा प्रकार जाणून घेतला. पोलिसांच्या तपासात दोन्ही महिला आरोपी धुळे जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दोघींना ताब्यात घेण्यात आले. विष प्रयोग झालेल्या कुटूंबावर सध्या सिव्हीलमध्ये उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकडीविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा
पारोळा पोलीस ठाण्यात योगेश ताराचंद पाटील यांच्या फिर्यादीवरुन सुमन सुभाष सहाणी, आरती सूर्यप्रकाश पटेल (पूर्ण पत्ता नाही), एजंट विनोद निंबा पाटील (पिंप्राळा, ता.जळगाव) व अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक अशोक पिंपळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !