भालोद महाविद्यालयात डॉ.राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन साजरा


भालोद, ता.यावल (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत लोकशाहीत जिवंत असली पाहिजे. राममनोहर लोहिया यांनी या साठीच कायम लढा दिला. वर्णभेद जातीभेद स्त्रीपुरुष विषमता हे नष्ट झाले पाहिजे, सप्त क्रांती शिवाय हे शक्य नाही, असे प्रतिपादन खडसे महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चव्हाण यांनी केले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रख्यात समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यानिमित्ताने ‘सप्तक्रांती आणि सामाजिक समता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे होते. यावेळी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे प्राचार्य प्रा.डॉ.एच.ए.महाजन यांचे स्वागत डिंपल भालेरावने ग्रंथभेट देऊन केले. प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे यांचे स्वागत मोक्षदा कोंगे तर प्रा.डॉ.गणेश चव्हाण यांचे स्वागत अतिकेश माळी याने ग्रंथभेट देऊन केले. आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !