भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन


भुसावळ (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : शहरातील के. नारखेडे विद्यालय सेच शिक्षण विभाग पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते विद्यालयात उद्घाटन करण्यात आले.

पाच गटात प्रदर्शन
प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर, नववी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर, दिव्यांग गट स्तर तसेच शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गट, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक गट, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर शैक्षणिक साहित्य गट अशा एकूण पाच गटात प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली.






यांची होती उपस्थिती
माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी डॉ.कुलदीप ठाकरे, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, रागिणी चव्हाण, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील हेाते. के.नारखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले. मंत्री संजय सावकारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पर्यावरण पूरक विषयावर पाणी बचतीचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन एस.पी.महाजन यांनी तर आभार बी.डी.धाडी यांनी मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, सुनील वानखेडे, एस.एस.अहिरे, बी.पी.वारके, एस.एम.पाटील, नीलिमा पाटील, प्रशांत वंजारी, बी.बी.जोगी, ए.एम.जटाळे यांच्यासह मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी यांनी परिश्रम घेतले.संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे व संस्था सदस्य विकास पाचपांडे, विविध शाळातील शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धक विद्यालयाच्या दोन्ही शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभाग प्रमुख बी. ए.पाटील यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !