भुसावळ तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत ताप्ती स्कूलचा संघ प्रथम

14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग


भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर आयोजित भुसावळ तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रिकेट स्पर्धांचा तीन दिवसांनंतर उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 14 वर्षाखालील स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आणि तालुका क्रीडा समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, प्रा.मनोज वारके, मेघश्याम शिंदे, सुनील चौधरी, मुकेश मोरे, हिंमत पाटील, विजय संकट यांच्यासह प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.






गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे यांनी खेळ हा केवळ विजय किंवा पराभवापुरता मर्यादित नसून शिस्त, मेहनत, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसीत करणारे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रालाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

असा आहे स्पर्धेचा निकाल
14 वर्षांखालील मुले- प्रथम क्रमांक- ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ
द्वितीय क्रमांक : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ
तृतीय क्रमांक : सेंट अलॉयसेस स्कूल, भुसावळ

17 वर्षांखालील मुले- प्रथम क्रमांक- डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ
द्वितीय क्रमांक- वर्ल्ड स्कूल, भुसावळ
तृतीय क्रमांक- ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ

17 वर्षांखालील मुली- प्रथम क्रमांक- डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ
द्वितीय क्रमांक- म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ

19 वर्षांखालील मुले- प्रथम क्रमांक- पु.ओ.नाहाटा कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ
द्वितीय क्रमांक- बियाणी ज्युनिअर कॉलेज, भुसावळ
तृतीय क्रमांक- फकरुद्दीन अली उर्दू स्कूल, वरणगाव

19 वर्षांखालील मुली
प्रथम क्रमांक- बियाणी ज्युनिअर कॉलेज, भुसावळ

पंच आणि आयोजकांचे महत्त्वपूर्ण योगदान
पंच म्हणून हिंमत पाटील, विनय काळे, याकूब शेख, विजय संकट, मुकेश मोरे, चंद्रकांत बरहेगे, गौरव गोसावी, युवराज, मनोज वारके आणि सुमित दासगुप्ता आदींनी काम पाहिले. आभार प्रदर्शन मेघश्याम शिंदे यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !