नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : मोलगीत 28 लाख 58 हजारांचा 58 किलो गांजा जप्त !

60 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा : अवैध गांजाची शेती पोलिसांच्या ऐरणीवर


नंदुरबार (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईअस्त्र उगारले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्यासह पथकाने मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुणाखांब गावातील मोदरापाडा परिसरातील शेतात बेकायदेशीररीत्या लागवड केलेल्या शेतीवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 28 लाख 58 हजार 300 रुपये किंमतीची 58 किलो 246 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 रोजी नंदुरबार गुन्हे शाखेचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हुणाखांब गावाच्या शिवारातील मोदरापाडा येथील एका शेतात बाजरीआड गांजा शेती फुलवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह पथकाने पंचांसमक्ष पाहणी करीत 28 लाख 58 हजार 300 रुपये किंमतीची 58 किलो 246 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. संशयीत सोत्या काल्या तडवी (60, रा.मोदरापाडा, हुणाखांब, पो.पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार) याच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तडवी, जितेंद्र पाडवी, पोलीस अंमलदार अनिल नागरगोजे, अभय राजपूत, हेमंत बारी, विनोद पाटील, रवींद्र अहिरे आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !