अमळनेरात अतिक्रमित टपर्‍या हटवल्या : कारवाईने उडाली खळबळ


अमळनेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : नगरपरिषदेने भूखंड 123 मधील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. 10 टपर्‍या काढण्यात आल्या तर रहिवासी व इतर टपरी बांधकाम व्यवसायिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यास मुदत देण्यात आली.

पथकाची जेसीबीद्वारे मोहिम
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, अविनाश बिर्‍हाडे, चंदू बिर्‍हाडे, राज रामराजे, जितेंद्र चावरीया, दर्शन बिर्‍हाडे, सुनील संघिले, विकास बिर्‍हाडे, विशाल सपकाळे यांनी गेल्या चार दिवसांपासून भूखंड 123 मधील दुकानदार, टपर्‍या व शेड धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. दुकानदार स्वतःहून अतिक्रमण काढणार असल्याचे सांगत असलेतरी प्रत्यक्षात टाळाटाळ करीत असताना पथकाने जेसीबी मशीन घेऊन अतिक्रमण हटवायला सुरुवात केली. सुमारे दहा टपर्‍या हटवण्यात आल्या.






तर पालिका जवाबदार नाही
व्हाईट बिल्डिंगजवळ काहींनी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करून ठेवले होते. पालिकेने ते काढण्यासाठी सुरुवात केली असता एकाने पालिका कर्मचार्‍यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर पक्क्या घरांना व दुकानांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिक्रमण मोहीम सुरू राहणार आहे. अतिक्रमण धारकांनी स्वतःहून न काढल्यास पालिका काढेल व नुकसान झाल्यास दुकानदार जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !