अमळनेर तालुक्यात वॉश आऊट : 13 ठिकाणाहून दोन लाखांच्या दारूसह रसायने जप्त


अमळनेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : अमळनेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातर्फे तालुक्यात नवरात्र व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली. सुमारे 13 ठिकाणी धाडी टाकुन पावणे दोन लाखाची गावठी दारू, रसायन जप्त करून हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
गावठी दारू विकणार्‍या तसेच हातभट्टी चालवणार्‍यांविरोधात कारवाई करीत त्यांच्याजवळील गावठी दारू, कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक कविता ठाणगे, विलास गायकवाड, विलेश सोनवणे, हरीलाल पाटील, गोपाल पाटील, संदेश पाटील, राहुल पाटील, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, श्यामल पारधी, मोनिका पाटील, सागर साळुंखे, उदय बोरसे, सुनील पाटील, मिलिंद सोनार, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, मंगल भोई, लक्ष्मीकांत शिंपी, राजेंद्र देशमाने, राहुल पाटील, विजय भोई, दीपक पाटील आदींनी ही कारवाई केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !