जळगावात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणावर गोळीबार


जळगाव (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणावर गोळीबार झाला. या घटनेत अर्जुन रोहिदास राठोड हा तरुण जखमी असून त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागली आहे. जखमी अर्जुनवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एका संशयीताला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

प्रॉपर्टी वादातून गोळीबार
अर्जुन राठोड याचा प्रॉपर्टीच्या वादातून काही जणांसोबत जुना वाद असून या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल असल्याचे जखमी अर्जुनने सांगितले. याच वादातून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयाजवळ रात्रीच्या सुमारास त्याची हल्लेखोरांसोबत बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागल्याने तरुण जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.






पोलीस यंत्रणेची धाव
या हल्ल्यामागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचा आरोप जखमी अर्जुनने केला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी अर्जुनची विचारपूस केली. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरू आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला सुरू असल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !