भुसावळात आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत पुरूषांमध्ये बाहेती विद्यालयाचा तर महिलांमध्ये व.पू.होले महाविद्यालयाचा संघ विजयी
भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : शहरातीलला, विज्ञान पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी पुरूष महिला स्पर्धा 11 व 12 रोजी झाल्या. उद्घाटन प्राचार्य बी.एच.बर्हाटे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव नितीन बर्डे, क्रीडा मंडळ सदस्य प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, आंतर विद्याशाखा शैक्षणिक परिषद सदस्य प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.सतीश कोगटा, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, प्राचार्य डॉ.दीपक पाटील, प्रा.डॉ.उमेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.





शारीरीक सामर्थ्याचा वारसा
प्राचार्य बी.एच.बर्हाटे म्हणाले की, कबड्डी हा केवळ एक खेळ नाही, तर तो आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा आणि शारीरिक सामर्थ्याचा गौरवशाली वारसा आहे. या खेळामध्ये ताकद, चपळता, सहनशक्ती, एकाग्रता, प्रसंगावधान आणि सांघिक भावना यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
असा आहे स्पर्धेचा निकाल
पुरुष संघ- विजयी- अॅड.एस.ए.बाहेती कॉलेज, जळगाव, उपविजयी- व.पू.होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जळगाव, तृतीय- दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ, चतुर्थ- नूतन मराठा महाविद्यालय. जळगाव
महिला संघ- विजयी- व.पू.होले शारीरिक शिक्षण महाविद्यालय जळगाव, उपविजयी- नाहाटा कॉलेज, भुसावळ, तृतीय- डॉ.जी.डी.बेंडाळे महिला कॉलेज जळगाव, चतुर्थ- एम.जे.कॉलेज, जळगाव
यश मिळवलेल्या संघास ट्रॉफी देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यापीठ आंतर विद्याशाखा सदस्य व शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर क्रीडा मंडळ सदस्य, प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.विरेंद्र जाधव, प्रा.डॉ.अमोल पाटील, प्रा.नितीन चौधरी, प्रा.सुभाष वानखेडे, प्रा.अमर हटकर, प्रा.प्रणव बेलोरकर, प्रा.डॉ.निलिमा पाटील, प्रा.हिमाली बोरोले, प्रा.हरीश शेळके, सागर सोनवणे, साधू तागड आदी उपस्थित होते.
21 संघाचा स्पर्धेत सहभाग
आयोजन सचिव व शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.अख्तर खान, प्रा.डॉ.अनिल हिवाळे उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून जळगांव जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व पंच यांनी कार्य केले. स्पर्धेसाठी क्रीडा विभागातील कर्मचारी व सर्व महाविद्यालयातील खेळाडू यांनी परिश्रम घेतले. पुरुष 14 व महिला 07 एकूण 21 संघानी सहभाग घेतला.
