आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद सरोदे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार जाहीर


भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : वांजोळा रोड-परिसरातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद नारायण सरोदे यांना गेल्या 30 वर्षात वाचनालयाच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत पुण्यातील डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट- क्रीडा मंत्रालय भारत सरकार व निती आयोग संलग्नीत दिल्ली यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा दिला जाणारा राज्यस्तरीय भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र सरोदे यांना डॉ.रवींद्र भोळे, आरोग्य सेवा केंद्र – उरुळी कांचन, पुणे यांच्या द्वारा नुकतेच प्राप्त झाले.

31 रोजी पुरस्कार सोहळा
संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील समर्पित भावनेने कार्य करणार्‍या समाजवृत्तींना सदरचा पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता संकेत बँक्वेट हॉल, नवी पेठ, पुणे 30 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.






30 वर्षांपासून कार्य
सरोदे यांनी वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती अभियान, सार्वजनिक भव्य किर्तन महोत्सव, यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच समाजात निरलस नि सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍यांचा सन्मान सोहळा तसेच लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे संकलन गेल्या 30 वर्षापासून सातत्याने करीत असून आतापर्यंत वाचनालयाच्या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळविले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याने सरोदे व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !