जळगाव तालुक्यात तोतया पोलिसांनी हातचलाखीने 25 ग्रॅमचे दागिने लांबवले


जळगाव (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026)  : पोलीस असल्याची बतावणी करीत तोतया पोलिसांनी दाम्पत्याला भीती दाखवत अंगावरील दागिने रुमालात ठेवण्यास सांगून हातचलाखीने 25 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले. ही घटना म्हसावद रेल्वे गेट ते पाथरी जाणार्‍या रस्स्यावर घडली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात दोघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
वसंतराव सीताराम पाटील (37, चव्हाण नगर, म्हसावद) हे पत्नीसह दुचाकीवरून जात असताना म्हसावद रेल्वे गेटजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भीती घालत व खोटी बतावणी करीत महिलेच्या अंगावरील सर्व दागिने रुमालात सुरक्षित ठेवण्याचे सांगितले. यावेळी महिलेने दिड तोळे वजनाची मंगलपोत, पाच ग्रॅमचे वेल तसेच पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 25 ग्रॅम वजनाचा व जुन्या भावानुसार 90 हजार रुपये किंमतीचा ऐवज रूमालात ठेवला. संशयीतांनी नजर चुकवत रूमालातील ऐवज लंपास केला.






काही वेळेनंतर दाम्पत्याने रुमाल पाहिल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार ईश्वर लोखंडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !