दहिगावात कांदा रोपाचे पैसे मागितल्यावरून वाद : दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा


यावल (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026)  : यावल तालुक्यातील दहिगाव येथे कांद्याचे रोप चे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. या वादातून शिवीगाळ करून दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका गटाकडून चार जणांविरोधात दुसर्‍या गटाकडून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले दहिगावात ?
दहिगाव येथे कांदा रोपाचे दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला. जितेंद्र पाटील (50) यांना अशोक उर्फ किरण दामू पाटील, साधना पाटील, तेजस पाटील, अनिकेत पाटील या चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच कुकर त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.






दुसर्‍या गटाकडून चौघांविरुद्ध गुन्हा
कांदा रोपाचे पैसे मागितल्यावरून झालेल्या वादातून 38 वर्षीय महिलेला जितेंद्र पाटील, वैशाली पाटील, प्रशांत पाटील व ज्ञानेश्वर पाटील या चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत ठार मारून टाकण्याची धमकी दिली. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !