भुसावळातील दीपक महाराज यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार जाहीर
भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : शहरातील हभप दीपक प्रल्हाद पाटील महाराज यांना पुण्यातील डॉ.मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग दिल्ली संलग्न यांच्यावतीने अत्यंत प्रतिष्ठेचा दिला जाणारा राज्यस्तरीय भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र दीपक महाराज यांना डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र, उरुळी कांचन, पुणे यांच्याद्वारा नुकतेच प्राप्त झाले आहे.
31 रोजी पुण्यात पुस्काराचे वितरण
संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील समर्पित भावनेने कार्य करणार्या सेवाव्रतीना सदरचा पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी संकेत बँक्वेट हॉल, नवी पेठ पुणे -30 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.





दीपक महाराज यांनी विद्यार्थी दशेपासूनच भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथ पारायण, संत विचार निरुपणाच्या माध्यमातून खानदेशात आध्यात्मिक कार्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करतात. सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव, विद्यार्थी गुणगौरव तसेच संत गजानन महाराज ग्रंथ संगीत निरूपण व हरिनाम सप्ताहाच्या सारख्या प्रबोधनात्मक कार्याबरोबर विविध शैक्षणिक व राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी सातत्याने सक्रिय सहभाग घेतात. देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती, निसर्ग- पर्यावरण, आई-वडील, गुरुजन व समाज याबाबतीत प्रबोधन करून जीवनाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवचन कीर्तनातून करीत असतात. या सर्व कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 193 वर्षाची सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरेच्या सर्व गुरुजनांना, सेवाधारी कार्यकर्त्यांना व खानदेशातील भजनी मंडळाना सदरचा पुरस्कार समर्पित करतो, असे दीपक महाराज यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सांगितले.
