धरणगावातून होंडा शाईन लांबवणारा मध्यप्रदेशातील चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

25 हजारांची दुचाकी जप्त : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


जळगाव (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : धरणगाव येथून चोरट्याने 25 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दुचाकी लांबवली होती. गुन्हे शाखेने तपासादरम्यान मध्य प्रदेशातील एका आरोपीला कजगाव येथून ताब्यात अटक केली व आरोपीच्या ताब्यातून दुचाकी जप्त करण्यात आली. मनोज केदार बारेला (हुगाने, ता.सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?
7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता धरणगाव बसस्थानकासमोरून काळ्या रंगाची होंडा कंपनीची सिबी शाईन मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.एल.0268) चोरीला गेली होती. गुन्हे शाखेकडून तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व फुटेज निष्पन्न केल्यानंतर संशयीत कजगाव, ता.भडगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीत मनोज केदार बारेला (हुगाने, ता.सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) ने दुचाकी चोरीची कबुली देत दुचाकी काढून दिली. आरोपीला वाहनासह धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.






यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार विष्णू बिर्‍हाडे, हवालदार दीपक माळी, हवालदार हरिलाल पाटील, हवालदार रवींद्र पाटील, हवालदार रावसाहेब पाटील, हवालदार राहुल कोळी, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल गोपाल पाटील, अंमलदार जितेंद्र चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !