भुसावळात सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थिनींना शरबत व थंड पेयजल वाटप


भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : सेवा संकल्प अभियानांतर्गत गंगाराम प्लॉट, माहूरकर टेंट हाऊस परिसरातील रहिवासी व आस्थापना संचालक यांच्या लोकसहभागातून शारदोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शालेय विद्यार्थिनींना गुलाब शरबत व थंड पेयजलाचे वाटप करण्यात आले. शहरातील गंगाराम प्लॉट भागात अहिल्यादेवी कन्या विद्यालय आयोजित शारदोत्सव विसर्जन मिरवणुकीत हा उपक्रम राबविण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सीमा नरवाडे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा अनिता आंबेकर, सचिव वंदना सोनार, बेबी पाटील, कल्पना पाटील, सीमा खरोटे, रेणुका लोखंडे, रेखा रत्नपारखी, अर्चना राठोड, निर्मला पाटील, स्नेहल राठोड, सरिता वाणी, अर्चना माहुरकर, प्रभावती कासार आदी महिला उपस्थित होत्या. भाजपा शहराध्यक्ष (दक्षिण) किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, जयंत माहुरकर, अमोल महाजन शिक्षक आघाडी जळगाव जिल्हा पूर्व सरचिटणीस भास्कर पाटील, राकेश राठोड, बिरजू शेठ आहुजा, दगडू सुरती, अजय गोग्या, दीपक गोग्या, गजानन पाटील, कुमार पाटील, संघदीप नरवाडे, नंदकिशोर पाटील, किशोर बाकसे, उमेश माहुरकर, प्रवीण भंगाळे,गोलू बठेजा, दीपक आठवाणी, किरण चौधरी, मयूर चौधरी, श्याम माहुरकर, गोपी सिंग राजपूत व अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !