भुसावळातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पोक्सो कायद्यासह बालविवाह मुक्त भारत अभियानावर जनजागृती


भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांमध्ये बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारापासून सुरक्षितता आणि बालविवाह निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पॉक्सो कायदा व ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ या विषयांवर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायदा, बालकांचे अधिकार, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि सर्वांगीण विकासावर होणारे विपरीत परिणाम स्पष्ट करण्यात आले.






बालविवाह ही सामाजिक समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका घ्यावी. बालकांवरील अत्याचार किंवा बालविवाहाची घटना निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देऊन बालकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

‘बालविवाह मुक्त भारत’ घडविण्यासाठी जनजागृती, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक सहभाग आवश्यक आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क, सुरक्षितता, कायदेविषयक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.राजपूत, एल.आर.पाटील, जे.ए.तायडे, जे.व्ही.भोळे, एम.बी.काळे, महिला व बालक सहाय्य कक्ष समुपदेशक भाग्यश्री सोनवणे, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प आधार बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी मोहिनी धनगर, दीपाली हिवाळे, समाधान पाटील, सुनील जगन हिवाळे यांचा सहभाग होता.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !