राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत थोरगव्हाणच्या देशमुख विद्यालयातील योगराज सपकाळेला कांस्यपदक
थोरगव्हाण, ता.रावेर (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : दि एज्युकेशन सोसायटी संचलित डी.एस.देशमुख विद्यालयाचा इयत्ता अकरावीचा होतकरू खेळाडू योगराज रवींद्र सपकाळे याने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे.
विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती येथील तपोवनात झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 17 वर्षे वयोगट व 65 किलो वजन गटात योगीराजने अत्यंत चुरशीची झुंज देत तृतीय क्रमांक पटकावून हे यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या आणि परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. योगराजला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जे.ए. चौधरी तसेच सूर्या व्यायाम शाळेचे संचालक व क्रीडा शिक्षक अविनाश महाजन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.





या यशाबद्दल दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, संचालक रजनी रामकृष्ण पाटील, चंद्रकांत देशमुख, राजेंद्र देशमुख, कमलाकर चौधरी, मधुकर कोल्हे, प्रकाश बाऊस्कर, नंदकुमार चौधरी, संजय चौधरी, चंद्रकांत सुराजी पाटील, रवींद्र (गोविंद) चौधरी, दिनेश पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.के.पाटील, ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी योगराज सपकाळे व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
