वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 49 ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन


भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र शासनाच्या सेवा संपर्क अभियानांतर्गत वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एकूण 49 ज्येष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक ओळखकार्डांचे भुसावळ तहसीलदार नीता लबडे, भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक दीपाली जगताप यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.

मासिक सभा उत्साहात
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड येथे झाली यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ तहसीलदार नीता लबडे. भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक दीपाली जगताप, प्रकाश पाटील, सतीश जंगले उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय ओळखपत्राचे ज्येष्ठ नागरिकांना वितरण करण्यात आले.






सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित रहा
उपनिरीक्षक दीपाली जगताप यांनी ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीविषयी मार्गदर्शन केले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील देऊ नयेत. बँकेच्या नावाने फोन करून वैयक्तिक माहिती मागणार्‍यांपासून सावधन राहावे.ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार ओळखणे, अनोळखी फोन व संदेशांवर विश्वास न ठेवणे आणि आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे, यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अनुभवाने समृद्ध ज्येष्ठ नागरिक समजा
ज्येष्ठत्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेशही देण्यात आला. वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तींनी स्वतःला वृद्ध न समजता अनुभवाने समृद्ध ज्येष्ठ नागरिक समजावे, असे प्रतिपादन तहसीलदार नीताताई लबडे यांनी केले. आपले आरोग्य आपल्या हातात असून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन इतरांवरील अवलंबित्व कमी करावे. तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी कृतज्ञतेची भावना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय ओळख पत्र मिळाल्याने जेष्ठ नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.जी.पाटील तर सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !