‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत भुसावळातील जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बाजी!
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ मध्ये जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खान्देशचा राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मंडळाने गणेशोत्सवादरम्यान केलेली उत्कृष्ट सजावट, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक कार्य आणि गणेशोत्सवाचे उत्तम नियोजन यामुळे हा बहुमान प्राप्त केला आहे. या यशामुळे मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





