भुसावळात एसीबीची मोठी कारवाई : एक हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखच्या शिपायासह सेतू सुविधा केंद्र चालक जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : जमीन मोजणी संदर्भातील प्रकरणातील त्रृटी दूर करण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील तसेच भुसावळ शहरातील सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण यांना जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने जमीन मोजणी संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केेल्यानंतर त्यात त्रृटी असल्याने ती दूर करण्यासाठी शिपाई सचिन पाटील याने लाच मागितल्यानंतर जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आला. टीव्ही टॉवर परिसरात खाजगी इसम तथा भुसावळातील सेतू सुविधा केंद्र चालक राकेश चव्हाण यांनी लाच मागून प्रोत्साहन दिल्याचे यावेळी स्पष्ट झाल्यानंतर सापळ्याअंती दोघांना अटक करण्यात आली.






जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

(लवकरच सविस्तर बातमी)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !