चुंचाळे गावातून घराबाहेर बांधलेले गोवंश चोरी


यावल (शनिवार, 16 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील चुंचाळे गावात घराबाहेर अंगणात बांधलेले गोवंश अज्ञात चोरट्याने चोरी केले. 25 हजार रुपये किंमतीचे हे गोवंश होते. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीने वाढली चिंता
चुंचाळे गावातील रहिवासी बाबुलाल छबू पाटील यांनी त्यांच्या घराच्या बाहेर 25 हजार रुपये किंमतीची त्यांची वासरी अर्थात गोवंश बांधले असताना चोरट्याने तेथून पधूधनाची चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !