धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनी स्थानकावर 14 रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा
नागपूरला जाणार्या प्रवाशांना दिलासा ; 19 व 20 ऑक्टोबर रोजी विशेष व्यवस्था
भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : धम्मचक्र प्रवर्तन दिन 2026 निमित्त नागपूर येथे येणार्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 19 आणि 20 ऑक्टोबर 2026 रोजी निवडक 14 रेल्वे गाड्यांना अजनी स्थानकावर एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणार्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
19 ऑक्टोबर रोजी चार गाड्यांना थांबा
सोमवार, 19 ऑक्टोबर रोजी डाउन दिशेने धावणार्या गाडी क्रमांक 12833 अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12159 – अमरावती-जबलपूर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 19021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11204 मडगाव-नागपूर एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे.





20 ऑक्टोबर रोजी डाउन दिशेच्या सहा गाड्या थांबा
मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी डाउन दिशेने धावणार्या सहा गाड्यांना अजनी स्थानकावर एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. त्यात गाडी क्रमांक 13426 सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12129 पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12844 अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल, गाडी क्रमांक 22848 – लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे.
अप दिशेने धावणार्या चार गाड्यांनाही थांबा
20 ऑक्टोबर रोजी अप दिशेने धावणार्या 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12834 – हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस व गाडी क्रमांक 19022 – ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेसला अजनी स्थानकावर एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.
प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन
प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीच्या आगमन व प्रस्थानाच्या वेळेची खात्री करून घ्यावी तसेच रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कालावधीत प्रवाशांची ये-जा सुरळीत आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
