चिखली खुर्द येथे प्रौढाने विहिरीत उडी घेत उचलले टोकाचे पाऊल


फैजपूर (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : जवळच असलेल्या चिखली खुर्द गावात 52 वर्षीय प्रौढाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना विहिरीतून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुखदेव विठ्ठल मोरे असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिखली खुर्द, ता.यावल येथील सुखदेव विठ्ठल मोरे (52) यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. त्यांनी विहिरीत उडी घेतल्याचे निर्दशनास आल्यावर त्यांना तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालयात आणले असता जबर दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मोती पवार करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !