तुझे बोला था ना, जिंदा नहीं छोडेंगे म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला : कुख्यात बाबा काल्यासह तिघांविरोधात गुन्हा
भुसावळ (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तरुणाला तुझे बोला था ना, जिंदा नहीं छोडेंगे म्हणत कुख्यात बाबा काल्यासह तिघांनी शिविगाळ करीत लोखंडी रॉड व फायटरने मारून दुखापत केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले भुसावळात ?
आमीर खान इबरीस खान (38, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) या तरुणाने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, 17 रोजी 9.30 वाजेच्या सुमारास तो खडका गावाजवळील हॉटेल आपले सरकारजवळ उभा असताना संशयीत बाबा काल्या उर्फ मिर्झा आशिक बेग अस्लम बेग, हुसनीन शेख कुबूद्दीन व अन्य एका अनोळखीने दुचाकीवरून येत शिविगाळ केली. यावेळी संशयीतांनी तुझे बोला था ना, जिंदा नहीं छोडेंगे म्हणत धमकी देत बाबा काल्याने लोखंडी रॉड फायटरने तोंडाला मारुन दुखापत केली व संशयीत पसार झाले. जखमीवर तातडीने उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी जवाब दिल्यानंतर रविवारी सायंकाळी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक निलेश सरदार करीत आहेत.





