भडगावात राजस्थानच्या मीणा समाजाचे विजयसिंग पागडी यांचे स्वागत

समाजाचे अध्यक्ष अशोक परदेशी यांच्या कुटुंबाने केले स्वागत


भडगाव (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : राजस्थानातील रा.मोरेड. ता.सिकराय, जिल्हा दौसा येथील रहिवाशी व पुण्यातील आय.टी. कंपनीत नोकरीस असलेल्या विजयसिंग पागडी (घुनावत) यांनी समाजबांधवांच्या उपस्थितीत भडगावात सोमवारी दुपारी परदेशी, राजपुत, मीणा समाजाचे भडगाव तालुकाअध्यक्ष तथा पत्रकार अशोक परदेशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी समाज संघटना बांधणीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

घुनावत यांनी महाराष्ट्रात मीणा समाजाचे कार्यकर्तृत्व मोठया प्रमाणात असल्याचे गौरवद्गगार काढले. यापुढेही आपल्या मीणा समाजाचे संघटन वाढविण्यासाठी समाजबांधवांना आव्हान केलेले आहे. तसेच महाराष्टाृत मिणा परदेशी समाज बाधवांसह पदाधिकार्‍यांचे समाज संघटनेसाठी अतिशय जोमात कार्य सुरु आहे या कार्याबद्दल समाज बांधव व समाजाच्या सर्व संघटनांना मनापासुन शुभेच्छाही दिल्या. यापुढेही आपल्या समाजाची उत्तरोउत्तर प्रगती व्हावी. आणि जावळे येथे चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत सुरु असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामाविषयी उन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजासाठी मंगलकार्यालयासाठी विनामोबदला दिड एकर जागा जावळे येथील भुमिपूत्र अन समाज सेवक भगवान बापू लोदवाळ व गोरखदादा लोदवाळ या कुटुंबाने विनामोबदला समाजाच्या मंगल कार्यालयासाठी अनमोल जमिन दिली. त्यांचे समाजामार्फत मनापासून आभार मानले.





चाळीसगाव परदेशी, राजपुत उन्तनी मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष . भरतसिंग छानवाल साहेब, कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग बापू परदेशी, सचिव निलेश राजपुत तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिंनदन करुन समाजासाठी खर्या अर्थाने आपली समाजाची संघटना न्याय देत असुन समाजासाठी अनमोल कार्याची भरारी सुरू असल्याचे सांगितले.

जावळे येथील मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठीही संस्थेच्या कार्याची व समाज बांधवांच्या अनमोल सहकार्याबध्दल मनापासुन शुभेच्छाही दिल्या. समाज बांधवांच्या अनमोल कार्याचे राजस्थानच्या वतीने महाराष्टाृतील समाज बांधवांचे अनमोल कार्याचेही कौतुक केले. या प्रसंगी राजस्थानचे आदरणीय विजयसिंग पागडी घुनावत यांचा सत्कार परदेशी, राजपुत, मिणा समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अशोक परदेशी यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून केले. रेश्मा मीणा यांचा सत्कार वाडे ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला उपसरपंच उषा अशोक परदेशी व जंगीपुरा येथील अल्काबाई परदेशी या दोघांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन केला.

यावेळी राजस्थानचे मीणा समाजाचे विजयसिंग पाघडी ( घुणावत) तसेच त्यांच्या धर्मपत्नी रेश्मा मीणा यांचे समाजामार्फत उपस्थितांमार्फत शुभेच्छा देऊन आभार मानण्यात आले. याप्रसंगी जंगीपुरा येथील युवराज परदेशी, शेंदुर्णीचे मुन्ना परदेशी, अनिता परदेशी, मीना परदेशी, सीमा परदेशी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. भडगाव येथे येण्यापुर्वी जंगीपुरा येथे राजस्थानचे विजयसिंग पागडी व धर्मपत्नी रेश्मा मीना दाम्पत्याच्या हस्ते युवराज परदेशी यांच्या निवासस्थानी देवीची आरती करण्याचा मान देण्यात आला. यावेळी समाज बांधव, महिला व त्यांचे कुटुंबातील सदस्य हजर होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !