यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीत 28 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
यावल (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : यावल शहरातील चोपडा रोडावर असलेल्या जुन्या फॉरेस्ट कॉलनीमत एक 28 वर्षीय तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. तरुणाला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आशिश संजय खेडकर (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
तरुणाच्या आत्महत्येने खळबळ
यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील जुन्या फॉरेस्ट कॉलनीत आशिश संजय खेडकर हा तरुण वास्तव्यास होता मात्र या तरुणाने आपल्या राहत्या घरात शेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेतला. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अक्षय खेडकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.





