प्रलंबित मागण्यांसाठी भुसावळ तहसीलमध्ये सामूहिक रजा आंदोलन


भुसावळ- प्रलंबित विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेचे वर्ग तीन व चारच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी सामूहिक रजा आंदोलन करीत भुसावळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेचे जवळपास 26 कर्मचारी सहभागी झाले. गत पाच वर्षापासून शासनाने महसूल कर्मचारी संघटनेच्या बहुतांश मागण्यांना तत्वत: मान्यता दिली आहे परंतु अद्यापर्यंत यासंदर्भातला कोणताही शासन निर्णय काढण्यात आला नसल्याचे कर्मचारी म्हणाले.

तहसीलमध्ये कामकाज ठप्प
कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनामुळे तहसील कार्यालयात कामकाज ठप्प होवून नागरीकांचे हाल झाले. दिवसभर तहसीलमध्ये शुकशुकाट होता. संपामध्ये तलाठी, तहसीलदार तसेच नायब तहसीलदारांची संघटना सहभागी झाली नव्हती. पहिल्या टप्प्यात दुपारच्या जेवणाच्या सुटीत निदर्शने त्यानंतर घंटानाद व 28 ऑगस्ट रोजी कर्मचारी संघटनेने सामुहिक रजा आंदोलन पुकारले. जिल्हाधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर कर्मचारी संघटनेचे बी.एन.शिरसाठ, एस.पी.पाटील, एस.एस.शेख, डी.एच.बोरसे, एस.आर.सहाटे, वाय.सी.मुस्कावट, एम.बी.सपकाळे, रुपाली गुरव, एस.सी.तायडे, एस.एन.नागरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


कॉपी करू नका.